लोकशाही दिनात २१ अर्ज – तहसीलदार गणेश शिंदे
marathinews24.com
बारामती – नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने जळगाव सुपे येथे आयोजित तालुकास्तरीय लोकशाही दिनात २१ अर्ज स्विकारण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
मुख्याध्यापक पदासाठी अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन – सविस्तर बातमी
लोकशाही दिनात नागरिकांकडून महसूल, ग्रामविकास, बांधकाम, विद्युत, जलसंधारण अशा विविध विभागाशी निगडित एकूण २१ अर्ज स्विकारण्यात आले आहेत, या अर्जावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करुन ते वेळेत निकाली काढावेत, असे निर्देशही शिंदे यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.