Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

केजमधील २१ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

केजमधील २१ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

marathinews24.com

बीड – जिल्ह्यातील केजमधील २१ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. दोन वर्षाच्या मुलाला घरी ठेवून विवाहित घरातून निघून गेली आहे.बेपत्ता महिला कुणाला आढळल्यास केज पोलिस किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस बनण्याचे स्वप्न अधूरे; भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

केज येथील धारूर रोड नजिकच्या भवानी नगर येथे एक कुटुंब राहत आहे. कुटुंबातील पुरुष हा ड्रायव्हर असून दाम्पत्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. दि. ८ फेब्रुवारीला पती हा कामानिमित्त बाहेर गेला असताना, विवाहिता तिच्या दोन वर्षाच्या मुलाला शेजारी राहत असलेल्या दिराच्या लहान मुलीजवळ ठेवून गेली.

बस स्टैंड वरून जाऊन परत येते, असे सांगून महिला गेली. घरी परत येते असे सांगून गेलेली ती विवाहित तरुणी रात्री घरी परत आलेली नाही. तसेच तिचा मोबाईल बंद आहे. तिच्या पतीने नातेवाईकांकडे शोध घेतला असता आढळून आली नाही. बेपत्ता असलेल्या विवाहितेचा रंग-सावळा, शरीरबांधा मध्यम, उंची ५ फुट,अंगावर हिरव्या रंगाची साडी व राखाडी रंगाचे ब्लाऊज, गळ्यामध्ये मणी मंगळसुत्र, कानात पिवळ्या धातूचे कानातले दागिना, पायात चांदीचे चैन असे तिचा पोशाख घातला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे करीत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×