Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

बीडमध्ये ३३ किलो गांजा पकडला; एकजण ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची पात्रुडमध्ये कारवाई

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- मोटार सायकलस्वार ३३ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पैशांच्या वादातून साथीदारांच्या मदतीने केला मित्राचा खून – सविस्तर बातमी

बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला २३ जानेवारीला मोटार सायकलस्वार सय्यद अत्तार रहेमान सय्यद हा परळीकडे एसँगमध्ये ३३ किलो गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुशांत सुतळे यांनी पात्रूड येथे सापळा रचून या मोटार सायकलस्वाराला अटक केली. त्याच्या सॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला असून त्याची किंमत ७ लाख ४६ हजार एवढी आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायदा, गुंगीकारक औषध द्रव्ये आदी १९८५ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला.

आरोपीला माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अंबाजोगाईचे अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, सुनिल अंगलट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचीन आंधळे, बिभिशन चव्हाण, अतुल हराळे यांनी केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×