१२ तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या
marathinews24.com
पुणे – पैशांच्या वादातून साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड मारून चेहरा विद्रूप करुन खून केला. खून झालेल्याचे नाव निष्पन्न नसतानाही दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने चौघा आरोपींच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (४०, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम राजेश शिंदे (वय २५, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी) लकी सुरेंद्र सिंग (वय २३, रा. खडकी अम्युनेशन फॅक्टरी) सुनील संतोष खलसे ऊर्फ एस. के. (वय १९, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अभियंत्याला मारहाण – सविस्तर बातमी
वारजेतील आकाशनगरमध्ये निर्जन जागेत तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. २३) वारजे पोलिसांना आढळून आला होता. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारून तसेच दगडाने चेहरा ठेचून खून केला होता. वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. सहायक फौजदार बाळू गायकवाड व पोलिस अंमलदार साई कारके यांना गणपती माथा ते शिंदे पूल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कावडे व अंमलदार तेथे गेले. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्या दोघांना ताब्यात घेतले,त्यांच्याकडील माहितीवरून अन्य दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने ११ लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपवले तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले.
राजेंद्र ऐलगच्चे यांना वारजे येथील शनी मंदिर टेकडी येथे २१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलवले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रूप करुन टाकला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कामगिरी केली
























