Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अभियंत्याला मारहाण

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा

महिलेसह चाैघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयातील उपविभागीय अभियंत्याला मारहाण करुन कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेसह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याथ आला. आरोपींनी अभियंत्याला मारहाण केल्याची घटना मांजरीतील शेवाळवाडी पीएमपी बस आगार परिसरात शुक्रवारी घडली. याप्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयातील उपअभियंता राहुल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५२) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाणेर मेट्रो स्थानकाच्याआवारातून केबल चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी परिसरात पीएमपीचे आगार आहे. आगाराच्या परिसरात बस लावली होती. शासकीय जागेत बस लावल्याप्रकरणी महामार्ग प्राधिकरणाचे पथक, तसेच अभियंता अतुल सुर्वे, संभाजी लाखे आणि पथक तेथे गेले. खासगी बस लावल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी बसचे छायाचित्र काढले. कारवाई सुरू असताना आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेले साथीदार तेथे आले. ‘तुम्ही या जागेत पाऊल कसे ठेवले. ही जागा माझी आहे. येथून चालते व्हा’, अशी धमकी महिलेने दिली. त्यानंतर महिलेबरोबर असलेल्या साथीदाराने खासगी बसमध्ये ठेवलेले दांडके आणले आणि त्याने कुलकर्णी यांना दांडक्याने मारहाण केली. ‘ तुला संपवून टाकेल. तुझी नाेकरी घालवते. पोलिसांकडे तक्रार करते. जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार देते. मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नाेकरी घालवली आहे’, अशी धमकी दिल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×