Breking News
सायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यातश्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहारदिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

बाणेर मेट्रो स्थानकाच्या आवारातून केबल चोरीला

बाणेर मेट्रो स्थानकाच्या आवारातून केबल चोरीला

चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गिकेवरील बाणेर मेट्रो स्थानकाच्या आवारातून ५० हजार रुपयांची केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मेट्रोचे कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दाागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर हाॅटेलजवळ मेट्रो स्थानक आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) सकाळी आठच्या सुमारास मेट्रो स्थानक परिसरात एक टेम्पो थांबला. टेम्पोतून उतरलेल्या चोरट्यांनी मेट्रो स्थानकाच्या आवारात ठेवलेली ५० हजार रुपयांची केबल चोरून नेली. केबल चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करत आहेत. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना यापूर्वी मेट्रोचे साहित्य चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×