Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शेअर बाजारात गुंतविण्याच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २३ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आयडियल काॅलनी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले.

चोरट्यांनी त्यांना रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यावर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने २३ लाख ८७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत अ्हेत. अशाच पद्धतीने सायबर चाेरट्यांनी लाेणी काळभाेर भागातील एका तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत एका तरुणीने संदेश पाठविला होता. तरुणीने त्याला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाने तरुणीच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

एपीके फाईल उघडताच ज्येष्ठाची फसवणूक

अनोळखी क्रमांकावरून मोबाइलवर पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडणे एका ज्येष्ठाला महागात पडले. चोरट्यांनी ज्येष्ठाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन तीन लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली होती. एपीके फाईल त्यांनी उघडली. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलमधील गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून तीन लाख ३८ हजार रुपये लांबविले. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×