Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ दुचाकी घसरुन दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकी घसरल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी धडकेत जखमी झाला. मेघनारायण प्रल्हाद शिंदे (वय ६२, रा संतोषनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात पादचारी गणेश कोडीतकर (वय ५०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हे जखमी झाले. कोडितकर यांनी याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जमीन मालकाची फसवणूक; कुख्यात बंडू आंदेकरसह तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कोडीतकर हे गुुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी साडेपाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. कोडितकर हे पॅनोरमा सोसायटीसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेले दुचाकीस्वार शिंदे यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. कोडितकर यांना दुचाकीने धडक दिली. दुचाकी घसरल्याने मेघनारायण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोडितकर आणि मेघनारायण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान दुचाकीस्वार मेघनारायण यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×