Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

जमीन मालकाची फसवणूक; कुख्यात बंडू आंदेकरसह तिघांविरुद्ध गुन्हा

उत्तमनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विकसनासाठी घेतलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प बांधल्यानंतर परस्पर सदनिकेची विक्री करुन जमीन मालकाची फसवणूक केल्या प्रकरणी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकरसह तिघांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुख्यात नीलेश घायवळविरुद्ध ७ वा गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात ज्येष्ठ नागरिकाची जमीन आहे. गृहप्रकल्प बांधण्यासाठी जमिन विकसनासाठी देण्यात आली होती. त्याबदल्यात आंदेकर आणि त्याच्या ओळखीतील दोन बांधकाम व्यावसायिक ज्येष्ठ नागरिकासह त्याच्या कुटुंबीयांना काही सदनिका देणार होते. मात्र, आरोपींनी परस्पर सदनिकांची विक्री करुन त्यांची फसवणूक केली, तसेच बनावट खरेदी दस्त तयार करुन बँकेकडून कर्ज घेतले, असे जमीन मालक ज्येष्ठ नागरिकाने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.

नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक केली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, सर्व रा. नाना पेठ), माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर, वनाराज आंदेकरची पत्नीला अटक केली होती. नाना पेठेतील मासळी बाजारातील विक्रेता, तसेच बांधकाम व्यवासायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी आंदेकरसह साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×