Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

कुख्यात नीलेश घायवळविरुद्ध ७ वा गुन्हा दाखल

बीड पंचायत समितीमध्ये राडा

सोशल मीडियावर दहशत माजविणारी व्हिडीओ केले अपलोड

marathinews24.com

पुणे – समाज माध्यमातूून दहशत माजविणारी चित्रफीत (रील) प्रसारित केल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध – सविस्तर बातमी

पाेलीस शिपाई प्रशांत साखरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, कोथरूड), तसेच समाज माध्यमातील घायवळ खाते चालविणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमातून दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करणे, तसेच गुन्हेगारी टोळीचे उद्दात्तीकरण केल्या प्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अंगद नेमाणे तपास करत आहेत.

घायवळ याच्या विरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले . त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घायवळ याचे घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×