Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा; जैन बोर्डिंग विश्वस्तांच्या निर्णयाला प्रखर विरोध

marathinews24.com

पुणे – ‌‘अहिंसा परमो धर्म की.. जय‌’, ‌‘धर्माचा व्यापर बंद करा‌’, ‌‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही‌’, ‌‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा‌’, ‌‘जैन मंदिर वाचवा‌’, ‌‘जब तक सूरज-चांद रहेगा एचएनडी तेरा नाम रहेगा‌’ अशा घोषणा देत चारही पंथातील प्रक्षुब्ध जैन समाजाने एकत्र येऊन जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. भव्य मोर्चाद्वारे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना दिले.

पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची खांदेपालट – सविस्तर बातमी

मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. जमीन विक्रीविषयी जाहीर नाराजी व्यक्त करण्यासाठी जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील जैन बांधवांनी काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक घेऊन शुक्रवारी (दि. 17) जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान भव्य मोर्चा काढला. मोर्चाच्या अग्रभागी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषिजी, माताजी महाराज हे मुनीगण होते. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैन समाजाच्या मागणीस पाठींबा दर्शविला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जैन बांधव-भगिनी मोठ्या संख्येने जैन बोर्डिंगच्या आवारात एकत्र आले. येथे आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज यांनी जमीन विक्री बेकायदा असून त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे, असे आवाहन केले.

त्यानंतर जैन बोर्डिंग येथून मोर्चाला सुरुवात झाली. संचेती हॉस्पिटल, जुना बाजार या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा नेण्यात आला. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. जैन समाजातील शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सन 1958 साली स्थापन झालेली सार्वजनिक धर्मदाय संस्था असून संस्थेच्या ताब्यात मॉडेल कॉलनी येथील सुमारे 12 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे. ट्रस्टच्या संपत्तीबाबत काही व्यक्तींमार्फत विकसकांशी व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही स्थानिक स्तरावर विकास कामे व हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येत आहे.

जैन समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या ठिकाणी असलेले जैन मंदिर हजारो जैन बांधवांच्या श्रद्धेचे केंद्र असून ते धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मंदिर व वसतिगृहाच्या अस्तित्वावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये ही जैन बांधवांची अपेक्षा आहे. जैन मुनी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज हे त्यांच्या संघासह सध्या जैन बोर्डिंग येथे वास्तव्यास आहेत.

आठ ऑक्टोबर 2025 रोजीचा ट्रस्ट आणि विकसक यांच्यातील विक्रीकरार आणि त्यानंतरचा कर्ज करार रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मादाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी वसतिगृहातील विद्यार्थी आणि जैन समाजाची मागणी आहे.

याचिकाकर्ता आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, ॲड. योगेश पांडे, ॲड. स्वप्नील बाफना, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, ॲड. जिंतूरकर, अक्षय जैन यांच्यासह युथ कार्यकर्ते आणि बोर्डिंगमधील आजी माजी विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल -लक्ष्मीकांत खाबिया

जैन बोर्डिंगच्या जमीनविक्रीप्रकरणी लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी गुरुवारी (दि. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व कायदेशीर बाबी समजून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी जैन समाजातील शिष्ट मंडळाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वसतिगृह आणि मंदिराविषयी समजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वास दिले, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×