शहर पोलिस दलात मोठी खांदेपालट; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी
marathinews24.com
पुणे – शहरातील पोलिस आयुक्तालयातंर्गत विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधितांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यात वारंवार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा सपाटा सुरू असून, अनेक अधिकार्यांमध्ये सध्या बदलीसंदर्भात नाराजीचे वातावरण आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने एसटीचा अनोखा उपक्रम – सविस्तर बातमी
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांची बदली पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेत केली आहे. येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांची वाहतुक शाखेत बदली केली आहे. मुंढव्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे यांची गुन्हे शाखेत, तर सुनील पंधरकर नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा याठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखेत, पोलिस निरीक्षक अजय संकेर्श्वरी यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, संतोष सोनवणे यांची नियंत्रण कक्षातून पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेत बदली केली आहे.
संदिपान वसंतराव पवार यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तसेच अरूण हजारे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, गुरूदत्त मोरे यांची नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षक पदावरून विशेष शाखेत केली आहे. दत्ताराम बागवे यांची विश्रांतवाडीतून गुन्हे शाखेत बदली केली आहे. तर पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांची गुन्हे शाखेतून वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा येथे बदली केली आहे. मंगेश हांडे यांची विश्रांतवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांची वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुंढवा येथे बदली केली आहे. तसेच पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक वानवडी येथे केली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांची कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रामबाग याठिकाणी बदली केली आहे. तर संतोष पांढरे यांची बंडगार्डन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली केली आहे.



















