Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

नऱ्हेत सोसायटीतील ७ दुचाकी पेटविल्या

Sahakarnagar gang terror

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारातील पार्क असलेल्या ७ दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सागर पहलाज ललवाणी (वय ३२) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ललवाणी हे नऱ्हे परिसरातील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत.

पुण्यात मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा उच्छाद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीच्या आवारात लावलेल्या दुचाकींना सोमवारी पहाटे आग लागल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेत ७ दुचाकी जळाल्या आहेत. दुचाकी जाळण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×