Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

पुण्यात मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा उच्छाद

पुण्यात मोबाइल हिसकावणार्‍या टोळीचा उच्छाद

धूम स्टाईलने सुसाट दुचाकीस्वारांकडून नागरिकांचे मोबाइल गायब

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडत असतानाच, आता पादचारी नागरिकांचे मोबाइलही हिसकावून नेले जात आहेत. त्यामुळे हातात मोबाइल घेउन चालणेही चोरट्यांना निमंत्रण देण्यासारखेच बनले आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरात चोरट्यांकडून मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमुळे पादचार्‍यांसह नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याची घटना मध्यवर्ती डेक्कन जिमखाना परिसरात घडली आहे. यापुर्वी घोले रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर मोबाइल चोरीमुळे चोरट्यांचा उच्छाद वाढल्याचे दिसून आले आहे.

गॅस कनेक्शन तोडण्याची दिली धमकी, ७ लाखांचा ऑनलाईन गंडा – सविस्तर बातमी  

घोले रस्त्यावर तरुणाचा ७० हजार रुपयांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी (९ जून) घडली. याबाबत तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण पाषाण भागात राहायला आहे. रात्री तो घोले रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत आला होता. मित्रांसोबत जेवण करुन रात्री साडेबाराच्या सुमारास तो हॉटेलमधून बाहेर पडला. घोले रस्त्यावर तो थांबला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील ७० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.

जंगली महाराज रस्त्यावर एका पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (८ जून) घडली. याबाबत तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास जंगली महाराज रस्त्याने निघाला होता. शाही भोज हॉटेलसमोर पादचारी तरुणाच्या हातातील १७ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले. सहायक फौजदार करडे तपास करत आहेत. दरम्यान, मोबाइल हिसकाविणार्‍या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी घोले रस्ता, जंगली महाराज रस्ता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

पुणे स्टेशन परिसरातून तरूणाचा मोबाइल चोरला

पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह परिसरात तरूणाचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पिंपरी-चिंचवड परिसरातील वडमुखवाडीत राहायला आहेत. शनिवारी (दि. ७ ) दुपारी ते अलंकार चित्रपटगृहाजवळ थांबले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील ८ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×