Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीचे आमिष पडले ८ लाखांना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला ८ लाख २० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ फेबु्रवारी ते १५ एप्रिल कालावधीत कर्वेनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वडारवाडीत तरूणावर वार, आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कर्वेनगरमध्ये राहायला असून, ११ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने त्यांना व्हॉटसअप मेसेज केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराला रक्कम पाठविण्यास भाग पाडले. ८ लाख २० हजार रूपये पाठवूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून लुटले

पार्टटाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी २० वर्षीय तरूणाला ३ लाख १८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ मे ते १४ जुलै कालावधीत कर्वेनगरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कर्वेनगरात राहायला असून, २४ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्याला व्हॉटसअ‍ॅपवर लिंक पाठविली होती. पार्टटाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केला. त्याला ३ लाख १८ हजार रूपये पाठविण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×