Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

पुणे शहरातून ९ गुन्हेगार तडीपार

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते यांचा दणका

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणाऱ्या ९ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच जिल्ह्यातून तडीपार केले आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एकाचवेळी नऊ जणांवर कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

डिस्काऊंटमधील शेअर्सचा नाद पडला दिड कोटींना – सविस्तर बातमी

जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा.), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा.), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या टोळ्यांमुळे सर्वसामान्यांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवत या नऊ जणांना तडीपार केले आहे. या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार वापरणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि त्यांच्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने, ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×