Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

घरात गॅसगळतीने ९९ वर्षीय जेष्ठ गंभीर जखमी

घरात गॅसगळतीने ९९ वर्षीय जेष्ठ गंभीर जखमी

धनकवडीत घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – घरामध्ये गॅसगळती होउन लागलेल्या आगीत ९९ वर्षीय जेष्ठ गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारास धनकवडीतील ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटीत घडली. अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. गंभीर जखमी झालेल्या जेष्ठाला रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, आगीत घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले असल्याचे दिसून आले आहे. बाबुराव दत्तात्रय महामुनी (वय ९९ रा. ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटी, धनकवडी ) असे गंभीररित्या जखमी झालेल्या जेष्ठाचे नाव आहे.

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण – सविस्तर बातमी 

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटीत रविवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर घरामध्ये गॅसगळती होउन आग लागल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या कात्रज आणि गंगाधाम गंगाधाम अग्निशमन केंद्रातील जवानांनी होज रील होजच्या मदतीने पाणी मारून आग विझवली.

आगीमध्ये बाबुराव दत्तात्रय महामुनी वय ९९ गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. आगीत घराच्या स्वयंपाक घरातील साहित्य इलेक्ट्रिक वायरिंग भिंतीचा कलर जळून नुकसान झाले. आग विझवण्यासाठी कात्रज अग्निशमन केंद्राकडे प्रभारी उपाग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, फायरमन किरण पाटील विनायक घागरे, योगेश कुंभार अक्षय देवकर, शुभम बोबडे, ड्रायव्हर बंडू गोगावले, गंगाधाम अग्निशमन केंद्रातील फायरमन राजेश घडशी, शैलेश गोरे, अक्षय मोढे, ज्ञानेश्वर कदम, धनंजय भिसे, चालक प्रसाद शिंदे यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×