Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

masrathinews24.com

पुणे – भावासोबत झालेल्या भांडणावरून रागाने पाहून गुंडाच्या टोळक्याने तरुणाला फायटरने मारहाण केली. ‘तुमको बहुत मस्ती आयी है, आते जाते समय घुरके देखते हो’, असे म्हणून तरुणाच्या तोंडावर फायटरने मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली मदतीसाठी आलेल्या भावालाही बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत वसिम गुलामरसुल शेख (वय ४१, रा. एसआरए बिल्डिंग, न्यू नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात नोकरीच्या मोहात तरूणाने गमवाले ११ लाख रूपये – सविस्तर बातमी 

पोलिसांनी वसीम अस्लम शेख (रा. पत्रा चाळ, न्यू नाना पेठ), जहीर शेख, समीर शेख, रिहान सय्यद, शहानवाज अली मेमन, रौफ व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना न्यू नाना पेठेतील एसआरए बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ७ नोव्हेंबरला रात्री अकराच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम शेख यांचा भाऊ अमजद शेख याच्याबरोबर झालेल्या जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून वसीम शेख हा त्यांच्याकडे नेहमी रागाने पाहत होता. ७ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी हे पत्नीसह घरी जात असताना वसीम शेख हा दिवाणी स्टील दुकानासमोर दोन तीन लोकांबरोबर बोलत बसला होता.

त्यावेळी तो फिर्यादीकडे रागाने बघत होता. त्याकडे दुर्लक्ष करुन ते घरी आले. रात्री अकराच्या सुमारास वसीम शेख याचा फोन आला. त्याने फिर्यादीला खाली बोलवले. ते खाली आल्यावर वसीम शेख याने शिवीगाळ करुन ‘तुमको बहुत मस्ती आयी है, आजे जाते समय घुरके देखते हो’ असे म्हणत हातातील फायटरने फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर मारले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीला वाचवण्यासाठी भाऊ चांद शेख हे आले असताना त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलिस कर्मचारी खान करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×