Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

उत्तमनगर भागातील घटना; दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – वैमनस्नयातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली. टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साई निवास, कोंढेवे-धावडे, एनडीए रस्ता) असे गँभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. करणसिंह गचंड, अमनसिंह गचंड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गचंड यांच्याशी अढळ याचा वाद झाला होता. गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास तो उत्तमनगर परिसरातून निघाला होता. आरोपी गचंड आणि साथीदारांनी त्याला अडवले. तू आम्हाला का भेटत नाही ? अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. आमच्या नादाला लागायचे नाही’, असे सांगून आरोपींनी परिसरात दहशत माजविली. पसार झालेले आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करत आहेत.

किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटना वाढल्या आहे. दुचाकीला धक्का दिल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन विद्यापीठ दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×