Breking News
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरे

शेअर ट्रेडींगमध्ये कमाईचे आमिष पडले ४२ लाखांना

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

सायबरचोरट्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये अतिरिक्त कमाईचे आमिष एकाला तब्बल ४२ लाखांना पडले आहे. आयपीओमध्ये गुंतवुणक करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मोबाईल धारक, बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गिरीष जाधव (५८, सिंहगडरोड) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १२ ते ३१ मे दरम्यान सिंहगड रस्ता पसिरात घडली.

शिवम आंदेकरसह आरोपींना गुजरात सीमेवर अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जाधव हे सिंहगड रोड परिसरात राहायला असून, १२ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अमान्स ब्रोकर शेअर ट्रेडींग तसेच आयपीओमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने त्यांना लिंक पाठवली. अकाउंट तयार करण्यास सांगितले. त्यावर ट्रेडींग करण्याच्या माध्यमातून किरकोळ रक्कम परतावा संकेतस्थळावर व अ‍ॅपवर दाखवला. त्यामुळे जाधव यांनी विश्वास ठेऊन आरोपींनी सांगितल्या प्रमाणे वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहे.

गुंतवणुकीच्या बहाण्याने ५ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एकाला ४ लाख ८७ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी नागनाथ दगडू लामतुरे (वय ५६, रा. माळवाडी, हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोबाईल धारक, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व लिंक धारक सायबर चोरट्यांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ मार्च ते २२ जुलै २०२५ दरम्यान घडला.

तक्रारदाराला एआय स्टूक मार्केट ट्रेडिंग अ‍ॅप ग्लोबल लेवलबाबत जाहीरात दिसली. त्यावर त्यांनी क्लिक केले असता, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्यानंतर इशा रेड्डी नावाच्या महिलेनी मार्केट मास्टर कंपनी मधून फोन केला. त्यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ४ लाख ८७ हजार रूपये घेऊन फसवणूक केली. पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×