Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शिवम आंदेकरसह आरोपींना गुजरात सीमेवर अटक

Ayush Komkar Crime

आयुष कोमकर हत्या प्रकरण

marathinews24.com

पुणे – सराईत गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा आंदेकर व पुतण्या शिवम आंदेकर यांच्यासह सहाजणांना पोलिसांनी शनिवारी (दि.१३) सायंकाळी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अटक केली. त्यांना रविवारी (दि.१४) पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुण्यात अट्टल घरफोड्याला अटक; ७ मोबाईलसह ३ दुचाकी जप्त, खराडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

कृष्णराज उर्फ कृष्णा बंडू आंदेकर (वय ४०), शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१) आणि शिवराज उदयकांत आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) या आरोपींना शनिवारी सायंकाळी गुजरात सीमेवर जेरबंद करण्यात आले.

नाना पेठेत भडका उडालेल्या टोळीयुद्धातून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याच्या झालेल्या खुनानंतर सहा प्रमुख आरोपी फरारी होते. असून तब्बल नऊ दिवसांनंतरही ते पोलिसांच्या हाती लागले. या गुन्ह्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी ( मोक्का ) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आंदेकर कुटुंबियांच्या अवैध बांधकामाबाबत पुणे शहर पोलिसांनी महापालिका प्रशासानाशी पत्रव्यव्हार केला असून त्यामुळे या टोळीचा आंदेकर कुटुंबियांच्या निवास स्थानाच्या अवैध बांधकामावर हातोडा पाडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंदेकर याच्या घराच्या झडतीमध्ये ७० लाख रुपये किंमतीचे सोने व जमिनीची कागदपत्रे आढळली. त्याबाबत कसोशीने तपास जारी करण्यात आला आहे.

वर्चस्वाच्या वादातून तसेच कौटुंबिक भांडणातून आयुष कोमकर याचा ५ सप्टेंबर २०२५ ला पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. यासंदर्भात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर व ताच्या कुटुंबातील नऊजणांसह तेराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध मोक्का ची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×