Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

पुण्यात तरूणीने विवाहिताला प्रेमात गुंतवले…

पैशामुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले

marathinews24.com

पुणे – नृत्यांगना प्रियेशीसाठी लाखो रुपये उडवल्यानंतर घरदार, बंगला नावावर करून दे म्हणत तरूण उपसरपंचाला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याची बीडमधील घटना ताजी आहे. असे असतानाच पुण्यातही प्रेमाचा बहाणा करून लग्न झालेल्या तरूणाला जाळ्यात अडकवून महिलांनी त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी केली. त्याला मानसिक त्रास देउन राहत्या घरी आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून, उर्वरित महिलांसह इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

शासकीय कामात अडथळा, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

गणेश अंकुश रायकर (वय ३५ रा. रायकर मळा, धायरी ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सपना राजाराम कदम (वय ४० रा. धायरी) हिला अटक करण्यात आली आहे. तिची मुलगी संजना कदम (वय २२) हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि गणेश रायकर यांचे लग्न झाले होते. दोघेही धायरीतील रायकर मळा परिसरात राहत होते. दरम्यान, त्याचठिकाणी कदम कुटूंबिय राहायला असून, आरोपी संजनाने गणेशला जाळ्यात अडकविले. त्याच्याकडून वारंवार पैसे घेत लुट केली. त्यानंतर संजनाची आई सपना आणि इतरांनीही गणेशकडून वारंवार पैशांची मागणी केली. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून गणेशने १३ सप्टेंबरला काळुबाई चौकातील राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणार्‍या कदम कुटूंबियाविरूद्ध पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार सपनाला पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×