Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

ज्येष्ठांसाठी आधारवड ठरत आहे “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७

ज्येष्ठांसाठी आधारवड ठरत आहे “एल्डर लाईन” राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७

“एल्डर लाईन १४५६७” ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार

marathinews24.com

पुणे – “घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…”, “कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…अशा व्यथा, आणि तक्रारी ज्येष्ठ नागरिक “एल्डर लाईन-१४५६७ या राष्ट्रीय हेल्पलाईनवर मोकळेपणाने व्यक्त करीत आहेत.

‌‘काही प्रॉब्लेम ये का?‌’ एकांकिकेने मारली बाजी; हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा – सविस्तर बातमी 

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही हेल्पलाईन देशामधील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. राज्यात डॉ. विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन, पुणे या संस्थेमार्फत ही सेवा पुरविण्यात येते. माहे ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या १४५६७ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आजवर ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनद्वारे आरोग्य, पोषण, आश्रयगृह, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, कौटुंबिक वाद, मालमत्ता हक्क, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ याबाबत कायदेशीर सल्ला, मानसिक ताण, नैराश्य, एकटेपणा, राग यावर समुपदेशन, बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांचे पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय अशाप्रकारच्या सेवांबाबत मोफतमार्गदर्शन करण्यात येते.

“एल्डर लाईन १४५६७” ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. वयोवृद्धांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे, हेच या सेवेचे ध्येय आहे. समाजातील गरजू ज्येष्ठांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×