Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तीनचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकीसाठी राखून ठेवता येणार

तीनचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकीसाठी राखून ठेवता येणार

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका करणार 

marathinews24.com

पुणे – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत तीनचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस दोन वर्षे मुदतवाढ – सविस्तर बातमी 

नव्याने सुरु होणाऱ्या तीनचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १८ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील व त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिलाव करण्यात येईल.

तीनचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष १९ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील व त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिलाव करण्यात येईल.

कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती, आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

वाहन क्रमांक आरक्षित केल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल.

कोणत्याही परिस्थितीत भरलेले शुल्क परत होणार नाही अथवा त्याचे समायोजन होणार नाही. तसेच आकर्षक क्रमांकाचे शुल्क बदल झाल्यास त्यावेळी विहीत केलेले शुल्क लागू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×