Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू

पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू

अजित पवारांचे दौरे वाढले

marathinews24.com

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन 2017 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरात दौरे वाढले आहेत. शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मध्ये येत असून लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहात २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

2017 च्या आधी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती मात्र भाजपने राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत व मोठ्या तयारीने सत्ता मिळवली. भाजपाला 128 पैकी 77 जागांवर विजय मिळाला. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 36 जागा आल्या. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच जणांनी ही भाजपची पाठराखण केली.

अजित पवारांची राष्ट्रवादी आता राज्यात भाजपसोबत सत्तेत असली तरी मागील पराभवाची सल अजित पवार यांच्या मनात आहे. महापालिका निवडणूक जवळ येताच अजित पवार यांचे दौरे शहरात वाढले आहेत. शनिवारी लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त पवार सभेत काय बोलतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×