पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत प्रवेश
marathinews24.com
पुणे – शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर २०२५ अर्ज सादर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव – सविस्तर बातमी
या प्रवेशप्रक्रियेत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकिरिता शासकीय वसतिगृह, प्रवेश देण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, दरमहा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्याकरिता भोजनभत्ता , गणवेश व इतर आवश्यक सुविधा शासनाकडून विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.





















