Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला, कात्रजमधील घटना

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

अज्ञात चोरट्यांविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे –  पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना २० सप्टेंबरला सकाळी पावणे अकराच्या सुमारास अंजनीनगर कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी कात्रज परिसरात राहणार्‍या ३१ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराचा दरवाजा उघडा असल्याची साधली संधी; नर्‍हे, खराडीत केली घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज परिसरात राहायला असून, २० सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास अंजनीनगर कात्रज परिसरातून पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यानंतर तिने आंबेगाव पोलसी ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार निलेश जमदाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×