वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – दवाखान्यात घरफोडी करणार्या अल्पवयीन चोरट्यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील रोकड जप्त करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपींच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घरफोडीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
विद्यापीठाच्या वसतीगृहातून विद्यार्थ्याच्या लॅपटाॅप चोरी – सविस्तर बातमी
पोलीस अंमलदार यतीन भोसले व अमोल गायकवाड त्यांना ‘संजिवनी दवाखाना फातिमानगरमध्ये घरफोडी करणार्या आरोपींची माहिती मिळाली. चौघापैकी दोघेजण हडपसरमधील सुरक्षानगरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउन दोघांना ताब्यात घेतले. फातिमानगरमधील संजिवनी दवाखान्यातील घरफोडीचे अनुषंगाने तपास केला असता, त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त केली. इतर दोन साथीदारांचा वानवडी पोलीसांकडुन शोध सुरू आहे. ही कामगिरी उपायुक डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे यांनी केली.























