Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बसप्रवासात महिलेची रोकड, मोबाइल चोरीला

तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात महिलेच्या पर्समधील १० हजारांची रोकड, दोन मोबाइल असा १८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २५ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास हाउस ऑफ बारकोड कदमवाडा ते मोदी गणपती प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी कात्रजमध्ये राहणार्‍या २९ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दवाखान्यात चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात, रोकड जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रजमध्ये राहायला असून, २५ सप्टेंबरला सकाळी सव्वादहाच्या सुमारास पीएमपीएल बसप्रवास करीत होती. बसमधील गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील १० हजारांची रोकड आणि ८ हजारांचे दोन मोबाइल चोरून नेले. काही अंतर प्रवास केल्यानंतर महिलेला पर्समधील रोकडसह मोबाइलची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार साबळे तपास करीत आहेत.

पुण्यात देवीच्या अंगावरील १० लाखांचे दागिने चोरीला

पुणे – नवरात्रोत्सवाची धामधुम सुरू असतानाच चोरट्यांनी देवीच्या अंगावरील तब्बल १० लाख रूपयांचा सोन्याचा हार चोरून नेला आहे. ही घटना २४ सप्टेंबरला भरदिवसा सुखसागरनगरमधील भुलेश्वर बंगल्यात घडली आहे. याप्रकरणी एका नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखसागरनगरातील भुलेश्वर बंगल्यात राहायला आहेत. नवरात्रोत्सवामुळे त्यांनी घरातील देवीच्या गळ्यात सोन्याचा राणीहार घातला होता. २४ सप्टेंबरला भरदुपारी चोरटे त्यांच्या बंगल्यात शिरले. चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील तब्बल १० लाख रूपये किंमतीचा सोन्याचा राणीहार चोरून नेला आहे. दरम्यान, तक्रारदार हे देवीची पूजा करण्यासाठी गेले असता, त्यांना देवीच्या गळ्यात दागिना दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजनुसार शोध सुरू

भरदुपारी बंगल्यात शिरून चोरट्यांनी देवीच्या गळ्यातील १० लाखांचे दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×