Breking News

सातबाराची प्रत देण्यासाठी लाच मागणाऱ्या ३ महिला तलाठी एसीबीच्या रडारवर

खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरालगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या ३ तलाठी महिलांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर गुरूवारी (दि. २५) ही कारवाई करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष विश्वास पाटील यांची हकालपट्टी करा-संभाजी ब्रिगेड – सविस्तर बातमी

हवेली तालुक्यातील सांगरुण तलाठी प्रेरणा बबन पारधी (३०, रा. जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), बहुली गावाच्या तलाठी दीपाली दिलीप पासलकर (२९, रा. स्वामी समर्थनगर, काकडेनगर, कोंढवा) आणि खडकवाडी गावच्या तलाठी शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (४०, रा. कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी) अशी कारवाई झालेल्या तलाठी महिलांची नावे आहेत. ४२ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना सांगरुण, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या हवेली तालुक्यामधील गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्ताविक रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या ७/१२ तसेच आठ अ उतारचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत पाहिजे होत्या.त्यासाठी ते सांगरुण येथे कार्यरत असलेल्या प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दीपाली पासलकर, तसेच खडकवाडी, कुडजे येथील तलाठी शारदादेवी पाटील यांना भेटले. त्यावेळी सांगरुण गावातील त्यांना आवश्यक असलेल्या सातबारा व आठ अ उताऱ्यासाठी २४० प्रतीसाठी प्रेरणा पारधी हीने सरकारी फी व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयांची लाच मागितली.

बहुली गावातील आवश्यक असणाऱ्या सातबारा व उताऱ्याच्या १०६ प्रतीसाठी दीपाली पासलकर हीने सरकारी फी व्यतिरिक्त ४ हजार ९१० रुपयांची लाच मागितली. तसेच खडकवाडी व कुडजे गावातील आवश्यक सातबारासाठी ३२ प्रतिसाठी शारदादेवी पाटील हीने सरकारी फी व्यतिरिक्त १ हजार ५२० रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांनी १९ सप्टेंबरला एसीबीकडे केली.

तक्रारीची पडताळणी तीनही तलाठींकडे करण्यात आली. प्रेरणा पारधी हीने सरकारी फी ३ हजार ६०० रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारी अगोदर ४ हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. आणखी १२ हजार ४०० रुपयांची लाच मागितली. दिपाली पासलकर हीने सरकारी फी १ हजार ५९० रुपये होत असताना त्यांनी तक्रारदाराकडे ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करुन ती रक्कम प्रेरणा पारधी हीच्याकडे देण्यास सांगितले. शारदादेवी पाटील हीने सरकारी फी ४८० रुपये असताना त्यांनी तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपये घेतल्याचे कबूल केले. आणखी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर २५ सप्टेंबर रोजी सापळा रचला. शारदादेवी पाटील हीला तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. सर्व तीनही आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असून, एसीबी कडून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×