Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय

खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय

महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई खराडी भागातील एका इमारतीत करण्यात आली. संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ, तसेच स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई वर्षा सावंत यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांना गुंगारा देणारा गुंड छत्रपती संभाजीनगरमधून अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवित होते. या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.

शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे. मार्केट यार्ड, तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लरवर कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×