पुण्यातील कुख्यात गुंडाची स्विर्त्झलंडमध्ये हवापालट; गुंड नीलेश घायवळ स्विर्त्झलंडमध्ये पळाला

९० दिवसांचा व्हिजा, अहिल्यानगर पोलिसांनी दिला पासपोर्ट

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरूद्ध कोथरूड पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केला. मात्र, गुन्हा दाखल होताच घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविलेल्या पासपोर्टद्वारे स्विर्त्झलंड गाठले आहे. त्याठिकाणी राहण्यासाठी त्याला ९० दिवसांचा व्हिजा मिळाला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. घायवळविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही, अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिला कसा, याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे.

गावठी पिस्तूल बाळगणार्‍या गुन्हेगाराला अटक; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

रस्त्यावर थांबलेल्या तरुणाने दुचाकीला जाण्यास रस्ता दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीतून सराईत निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी एकावर गोळीबार केला. त्यामुळे संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर काही अंतरावर टोळीने

वार केल्याची घटना १७ सप्टेंबरला कोथरूडमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करीत त्यांची धिंडही काढली. याप्रकरणात कुख्यात नीलेश घायवळ याच्याविरूद्ध थेट मोक्का कारवाई केली. मात्र, गुन्हा दाखल होताच, आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगरमधून मिळवलेल्या पासपोर्टचा आधार घेतला. त्यानंतर त्याने पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी थेट स्विझरलँड गाठले आहे.

कुख्यात नीलेश घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड परिसरातील रहिवाशी आहे. त्याने पुण्यासह ठिकठिकाणी दहशतीसह गंभीर गुन्हे करीत साथीदारांच्या मदतीने कोट्यावधींची माया कमविली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर भीतीपोटी घायवळने बनावट कागदपत्रांचा आधार घेउन पासपोर्ट तयार केला. त्यासाठी त्याने अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट मिळविला. त्यानंतर स्विर्त्झलंड देशामध्ये राहण्यासाठी ९० दिवसांचा व्हिजा मिळविला. दरम्यान, आता याप्रकरणी अहिल्यानगरमधील संबंधित पोलीस आता कचाट्यात सापडले आहेत. पासपोर्ट संदर्भात पुणे पोलिसांनी चौकशीला गती दिली आहे.

गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली आहे. त्यानंतर त्याने अहिल्यानगरमधून पासपोर्ट घेऊन स्विर्त्झलंडमध्ये पळाला आहे. याप्रकरणात आम्ही आरोपीला कोणी, कशापद्धतीने पासपोर्ट मिळवून दिला. त्याची चौकशी करत आहे. संबंधित प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसून, आरोपीसाठी लुकआउट नोटीस जारी केले आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×