Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पाेलीस शिपायाला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा

डिजिटल लॉक उघडून २७ लाखांचे दागिने लांबवले

हडपसर पोेलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस शिपायाला शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी हडपसर पोेलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मधुकर सरदारसिंग ठेंग-देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई कृष्णा घोळवे (वय २५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘काॅप्स २४’ हे पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस शिपाई घाेळवे या पथकात नियुक्तीस आहेत. हडपसर भागातील एका मद्य विक्री दुकानासमोर सोमवारी मध्यरात्री वादावादीची घटना घडली होती. त्यानंतर ठेंग-देशमुख याने पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.

लाच प्रकरणात सहायक फौजदाराला पकडले – सविस्तर बातमी

गस्त घालणारे पोलीस शिपाई घोळवे तेथे पाेहोचले. तेव्हा घोळवे यांनी त्याला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने घोळवे यांच्याशी वाद घातला. ‘तू मला ओळखत नाही का? पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला का सांगतो’, असे सांगून धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आाणल्या प्रकरणी देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजाविली आहे. पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×