Breking News
वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वनभारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकरपुणे ग्रँड टूर सायकल शर्यतीला जगातील चौथी ग्रँड टूर बनविण्यासाठी यूसीआय करणार सहकार्य

लाच प्रकरणात सहायक फौजदाराला पकडले

लोणावळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
शकील मोहम्मद शेख (वय ४५, रा. लोणावळा) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शकील शेख पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्तीस आहेत. त्यांची नेमणूक लोणावळा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या नारायणीधाम पोलीस चौकीत करण्यात आली होती.

गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीला बसवलं स्कॉर्पीओचा नंबर – सविस्तर बातमी

प्रकरणातील ४२ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी शकील शेख यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी सापळा लावून शेख यांना तडजोडीत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त भारती मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×