कुख्यात निलेश घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कोथरूड येथील गोळबार प्रकरणात कुख्यात निलेश घायवळ याच्यावर संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये कारवाई केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्याच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासह मोक्का दाखल असलेल्या गुन्ह्यात निलेश घायवळ याच्याकडून एक दुचाकी जप्त केली होती. त्या दुचाकीच्या नंबरप्लेट चौकशी केल्यानंतर तो नंबर त्या मोपेड दुचाकीचा नसून मोटार गाडीचा असल्याचे निष्पन्न झाले. आता या प्रकरणात घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बंडगर (37, रा. इंदापूर) याने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गावठी पिस्तूल बाळगणार्या गुन्हेगाराला अटक; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याकडे स्कॉर्पीओ गाडी आहे. ती त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये विकत घेतली आहे. 26 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना कदम नावाच्या पोलिसाचा फोन गेला व तुमची अॅक्सेस गाडी कुठे आहे अशी विचारणा करण्यात आली. परंतु, त्यावर त्यांनी तो अॅक्सेस गाडीचा नंबर नसून स्कॉर्पीओ गाडीचा नंबर असल्याचे स्पष्ठ केले.
तक्रादार जेव्हा पोलिस ठाण्यात आले तेव्हा त्यांच्या स्कॉर्पीओचा नंबर दुचाकीला लावलेला दिसला. 250/2025 या मोक्काच्या गुन्ह्यात ही अॅक्सेस गाडी जप्त करण्यात आली होती. तिला तक्रारदार बंडगर यांचा नंबर होता. महत्वाचे म्हणजे निलेश घायवळ याच्याकडून ही बनावट नंबरप्लेट असलेली गाडी जप्त करण्यात आली. त्यामुळे शासनाची व तक्रादारांची फसवणुक केल्याप्रकरणी घायवळवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.





















