Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १०० विद्यार्थ्यांसाठी सिंहगड हेरिटेज वॉकचे आयोजन

marathinews24.com

पुणे – संयुक्त राष्ट्र संघाच्या युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन मार्फत २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. यंदा २०२५ सालच्या दिनाचे घोषवाक्य “Tourism and Sustainable Transformation” असे असून शाश्वत पर्यटन विकासास चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात लिपिक पदासाठी माजी सैनिकांना रोजगाराची संधी – सविस्तर बातमी 

या निमित्ताने दिशा हॉलिडेज व पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील १०० विद्यार्थ्यांसाठी सिंहगड हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. सिंहगड किल्ल्याची निवड ही केवळ सहलीसाठी नसून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार व प्रेरणांचा जिवंत धडा मिळावा या हेतूने करण्यात आली होती. स्वराज्याच्या इतिहासातील सिंहगडाचे महत्त्व अधोरेखित करताना नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारलेले “गड आला, पण सिंह गेला” हे अमर वचन विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले.

या वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व त्यातील सत्य, त्याग, कर्तव्य आणि सन्मान या मूल्यांचे महत्त्व जाणून घेतले. सदर सहल विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×