Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कुख्यात नीलेश घायवळसह कुटूंबियाची बँकखाती गोठावली

कुख्यात नीलेश घायवळसह कुटूंबियाची बँकखाती गोठावली

१० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये केले फ्रीज; पुणे पोलिसांचा आणखी एक दणका

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासह त्याच्या कुटूंबियाची १० बँक खाती गोठावण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधितांना बँकेद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. बँक खात्यात ३८ लाख २६ हजार रूपये शिल्लक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशतीसह दादागिरी करणार्‍या टोळ्यांचे आर्थिंक स्त्रोत बंद करून त्यांना वठणीवर आणण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. यापुर्वी कुख्यात बंडू आंदेकर टोळीचीही बँकखाती गोठविण्यात आली होती.

पतीच्या छळामुळे पतीने केली आत्महत्या – सविस्तर बातमी

पुणे पोलिसांनी विविध बँक प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या कुटूंबियातील १० जणांची बँकखाती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित बँक प्रशासनाने नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ , पृथ्वीराज इंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवली आहे. १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये गोठवली आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना रक्कम काढता येणार नसून, कोणत्याही बँकेचा आर्थिंक व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

घायवळचे नंबरकारी घर बंद करून पळाले

तरूणावर गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासह टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करून त्यांची धिंडही काढली. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून स्विर्त्झलंड गाठले. दरम्यान, पोलिसांनी आता घायवळसोबत विविध गुन्ह्यात असलेल्या आरोपींची धरपकड सुरू केली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. मात्र, घायवळचे बहुतांश नंबरकारी (गंभीर गुन्ह्यातील सहभागी आरोपी) घर बंद करून पसार झाले आहेत.

कठोर कारवाई करणार, सोडणार नाही- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

कायदा सुव्यवस्था ठेवण्यासह गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवलेली नाही. कोथरूडमध्ये तरूणावरील गोळीबार प्रकरणात कुख्यात घायवळ टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. त्याच्याविरूद्धही ठोस कारवाईसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो विदेशात पसार झाला आहे. मात्र, त्याला मदत करणार्‍या प्रत्येकाची खैर केली जाणार नाही. त्यांच्याविरूद्ध ठोस कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

आडनावात फेरफार केला, पासपोर्ट बनवला

कुख्यात नीलेश घायवळ याने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पासपोर्ट मिळवल्याचा संशय पोलिसांना आहे. घायवळ ऐवजी गायवळ असे नाव त्याने पासपोर्टसाठी वापरले आहे. त्याला पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणार्‍या प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे. घायवळने मिळवलेल्या पासपोर्ट संदर्भात पुणे पोलिसांनी चौकशीला गती दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×