सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पतीच्या छळामुळे तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील बालाजीनगर भागात घडली.
ऋतुजा सागर चुंबळकर (वय २६, रा. गणेश पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ऋतुजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ऋतुजाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बेकायदेशिरित्या पिस्तुले, काडतुसे बाळगणार्याला बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजाचा विवाह सागर चुंबळकर याच्याशी झाला होता. विवाहानंतर ती धनकवडीतील बालाजीनगर भागात राहत होती. विवाहानंतर पतीने तिला त्रास देण्यास सुरूवात केली. मुलगा झाला पाहिजे, असे सांगून त्याने तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सूुरू केला. छळामुळे ऋतुजाने २७ सप्टेंबर रोजी बालाजीनगर भागातील राहत्या घरात विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.





















