सायबर चोरट्यांकडून तरूणाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – टेलीग्राम अॅपवरील टास्क पुर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २९ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर कालावधीत येरवड्यात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील वाघोली, बिबवेवाडीत घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण येरवड्यात राहायला असून, १८ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क केला. टेलीग्राम अॅपवर दिलेला टास्क पुर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर त्यांना किरकोळ स्वरूपात नफा मिळवून देत विश्वास संपादित केला. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात सायबर चोरट्यांनी तरूणाकडून तब्बल २९ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. मात्र, परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.
गुंतवणूकीच्या आमिषाने तरूणीची ५ लाखांची फसवणूक
टेलीग्राम आयडी धारकाने तरूणीला लिंक पाठवून तिला गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल ५ लाख २८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना २२ ते २६ जूनला कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरूणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.























