Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

बेकायदा फलक लावणाऱ्या आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नाना पेठेतील डोक तालमीजवळ बेकायदा फलक (फ्लेक्स) लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिठाई विक्रेत्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर, प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना पेठेतील इनामदार काॅम्प्लेक्स इमारतीच्या परिसरात आंदेकर टोळीने बेकायदा फलक लावले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्या प्रकरणी आंदेकर टाेळीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बेकायदा फ्लेक्स प्रकरणात आणखी एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा फ्लेक्स लावल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सचिन गायकवाड तपास करत आहेत.

आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरते केलेले बांधकाम, तसेच गणेश पेठेतील नागझरीत बेकायदा सुरू केलेल्या मासळी बाजारात ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×