Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

मिठाई विक्रेत्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – समाज माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला महागात पडली. एका महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्नेहा मोहित कदम (वय ३०, रा. सांगली) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंडजवळील रावणगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४५ वर्षीय मिठाई विक्रेता लष्कर भागात राहायला आहे. त्यांचे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्रीेचे दुकान आहे. समाज माध्यमातून मिठाई विक्रेत्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. २५ सप्टेंबर रोजी आरोपी लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्री दुकानात आली. मिठाई विक्रेत्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन दुकानाच्या गल्ल्यातील ५०० रुपये आणि मिठाईचे खोके ती घेऊन गेली. त्यानंतर महिला पुन्हा मिठाई विक्रेत्याला भेटण्यासाठी आली.

कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ७०० हजार रुपये घेतले. ७० हजार रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा धमकावून हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपये मागितले. तेव्हा मिठाई विक्रेत्याने तिला दुकानात बोलाविले. दुकानात दोन लाख रुपये देतो, असे सांगितले. तेव्हा तिने दुकानात येण्यास नकार दिला. ऑनलाइन पद्धतीने दोन लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मिठाई विक्रेत्याने आरोपी महिलेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये पाठविले. महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.

मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपी महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×