Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

बनावट आयपीएस असल्याचे भासवून केली चप्पल-ज्वेलरी चोरी

बनावट आयपीएस असल्याचे भासवून केली चप्पल-ज्वेलरी चोरी

लष्कर पोलीस ठाण्याची कारवाई; आई-मुलगी अटकेत

marathinews24.com

पुणे – बनावट आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून चप्पल-बुट आणि दागिने लंपास करणाऱ्या आई-मुलीला लष्कर पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुकानातील चप्पला व ज्वेलरी खरेदीच्या बहाण्याने माय लेकीने चोरी केली होती. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

कोंढवा, चंदननगर भागात घरफोडी – सविस्तर बातमी 

मिनाज मुर्तजा शेख ( वय ४०, रा. बुर्ज अल मर्जाना सोसायटी, कोंढवा) आणि रिबा मुर्तजा शेख ( वय १९) अशी अटक केलेल्या माय लेकीची नावे आहेत. आझम इक्रराब शेख (रा. भवानी पेठ, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझम शेख यांचे एम.जी. रोडवर कलीज नावाचे चप्पल दुकान आहे. १३ सप्टेंबरला संध्याकाळी आरोपी माय-लेकी दुकानात गेल्या. मिनाज शेख हिने आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून दुकानदाराला बनावट ओळखपत्र दाखवले. लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बुट खरेदी करून कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ असे सांगितले. मात्र पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या. प्रकरणाचा तपास महिला उपनिरीक्षक स्वाती भराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लोकेश कदम व अमोल कोडीलकर हे करत होते.

एम.जी. रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांनी मिळवला. २ ऑक्टोबरला पोलिसांनी दोघींना अटक केली. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून ४५ हजार रुपये किमतीच्या चप्पला व बुट जप्त केले. तसेच कॅम्प परिसरातील मचमोर दुकानातून चोरीला गेलेली काही ज्वेलरीही जप्त करण्यात आली आहे. आरोपी मिनाज शेख व रिबा शेख यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×