Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

अन्नातून विषारी ओैषध दिल्याने मांजराचा मृत्यू

महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या मांजराला अन्नातून विषारी ओैषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील एका सोसायटीत घडली. मांजराला अन्नातून विषारी औषध देऊन त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खुनाचा प्रयत्न करणारा सराइत दीड वर्षांनंतर अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३४ वर्षीय महिला मुंढवा परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. महिला राहत असलेल्या एका सोसायटीत एका मांजराचा वावर होता. तक्रारदार महिला मांजराला नेहमी खायला द्यायची. सोसायटीच्या आवारात मांजर फिरायचे. २२ ऑक्टोबर रोजी मांजर सोसायटीच्या आवारात निपचित पडले होते. मांजराचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

मांजराला अन्नातून विषारी ओैषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे तपास करत आहेत. शहरात भटके श्वान, तसेच मांजरांना खाद्यपदार्थातून विषारी ओैषध देऊन त्यांना मारण्यात आल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्यानंतर प्राणीप्रेमींनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांकडूनही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×