Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

खुनाचा प्रयत्न करणारा सराइत दीड वर्षांनंतर अटकेत

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

कोंढवा भागात नाव बदलून वास्तव्य

marathinews24.com

पुणे – खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गेले दीड वर्ष पसार असलेल्या सराइताला पोलिसांनी अटक केली. कोंढवा भागात ही कारवाई करण्यात आली. आझिम उर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनी लाँड्रिंगमध्ये दाखवली अटकेची भीती – सविस्तर बातमी  

गुन्हा दाखल केल्यानंतर शेख पसार झाला होता. गेले दीड वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. शेख हा कोंढवा भागात नाव बदलून वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती खडक पोलीस ठाण्याच्या तपासत पथकातील पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला अटक केली.

पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×