शेअर्स खरेदीवर नफ्याचे दाखवले आमिष; ७२ लाखांचा घातला गंडा

टास्कच्या आमिषाने तरूणाला गंडा

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटशी संबंधित कंपनीचा एजंट असल्याचे सांगत सायबर चोरट्याने संबंधित कंपनीच्या नावाच्या ॲपद्वारे शेअर्स खरेदी केले तर मोठ्या प्रमाणात प्रॉफीट होईल असे सांगून ७२ लाख २० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी बिबवेवाडी येथील ५६ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र बहाद्दूर नामक व्यक्तीविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैमनस्यातून फळ विक्रेत्यासह दोघांवर वार; खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला २५ जुलै ते २५ सप्टेंबर २०२५ कालावधीत जितेंद्र बहाद्दूर नामक व्यक्तीने संपर्क केला. त्याने स्वत:ला ग्लोबल सिक्योरिटीज एलएलपी या कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित कंपनीचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून त्याद्वारे शेअर्स खरेदी केले तर मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी बतावणी केली. तक्रारदाराने त्याच्यावर विश्वास ठेवत ५ वेगवेगळ्या बँक खात्यांवर ७२ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देवकाते करत आहेत.

मनी लाँड्रिंगमध्ये दाखवली अटकेची भीती; १ कोटी १९ लाखांना फसवले

पुणे – मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक करण्याची भीती दाखवत चौघांनी ज्येष्ठ महिलेची १ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ८० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंतकुमार शर्मा, आयपीएस विजय खन्ना, सीबीआय अधिकारी दया नायक, अनंत कुमार आणि व्हिडिओ ग्रुपकॉलवरील अधिकारी यांनी विविध पदांचा आणि नावाचा गैरवापर करत ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर कालावधीत चौघांनी संपर्क केला. महिलेसह त्यांच्या पतीला मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक करण्याची भीती या चोरांनी त्यांना दाखवली. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणातील रकमा पडताळण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये संबंधित रक्कम ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×