तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रवाशी असल्याचे भासवून तिघाजणांनी रिक्षा चालकाला खेड शिवापूर परिसरात नेउन मारहाण करीत रिक्षासह १ लाख ३२ हजारांची लुटमार केल्याची घटना २९ ऑक्टोबरला रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय रिक्षा चालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जात आहे.
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबियाच्या घरात चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रिक्षा चालक असून, २९ ऑक्टोबरला रात्री बाराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्याजवळ हॉटेलनजीक प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या तिघांनी त्यांना खेड शिवापूरला जायचे असल्याचे सांगून रिक्षाप्रवास सुरू केला. त्यानंतर त्रिकुटाने रिक्षा चालकाला बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील २० हजारांची रोकड, रिक्षा, मोबाइल असा १ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.






















