साडेदहा लाखांचा ऐवज लंपास
marathinews24.com
पुणे – सुटीनिमित्त घर बंद करून देवदर्शनासाठी गेलेल्या कुटूंबियाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २१ ते २८ ऑक्टोबर कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे. किरण प्रमोदकुमार झा (रा. खेसे पार्क, लोहगाव, मुळ रा. बिहार) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाह जुळवण्याच्या नावाखाली ‘विवाह मंडळांचे’ रॅकेट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार झा हे कुटुंबिय मूळचे बिहारमधील असून, कामानिमित्त लोहगावमध्ये राहायला आहेत. दि. २१ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ते काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. १० लाख ५१ हजार ९३ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. झा हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार एम. यु.ढवळे तपास करीत आहेत.



















