पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने १० लाखांचा गंडा

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने साबयर चोरट्यांनी तरूणीला तब्बल १० लाख ६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२४ ते ३० ऑगस्ट २०२५ कालावधीत बंडगार्डन परिसरात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी बंडगार्डन परिसरात राहायला असून, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना मेसेज करून पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणीचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना रक्कम वर्ग करण्यास सांगितले. पार्टटाईम नोकरी मिळेल, यासाठी तरूणीने सुरूवातीला काही रक्कम संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केली. तब्बल १० लाख ६ हजारांची रक्कम वर्ग केल्यानंतरही त्यांना पार्टटाईम नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधिताला रक्कम पुन्हा मागितली असता, त्यांचा संपर्क बंद झाला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करीत आहेत.

मनी लॉड्रींग केसमध्ये दाखविली अटकेची भीती; १४ लाखांचा ऑनलाईन गंडा

पुणे – टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला जाळ्यात अडकविले. त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवून तब्बल १४ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ ते २० सप्टेंबर कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव शेरी परिसरात राहायला असून, १२ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करीत त्यांचा मोबाइल क्रमांक मनी लॉड्रींगसह इतर चुकीच्या कामासाठी वापरला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल असून, अटक करण्याची भीती दाखविण्यात आली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक खाते तपासणीसाठी ऑनलाईनरित्या ताब्यात घेत असल्याचे सांगून रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.

शेअर मार्वेâटच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल १५ लाख १० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ जुलै ते २० सप्टेंबर कालावधीत बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×