Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

तरूणावर वार, शिंदेवस्तीवरील घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार टोळक्याने तरूणाला अडवून त्याच्यावर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केल्याची घटना २८ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास वानवडी परिसरातील शिंदे वस्तीवरील एस.आर.ए इमारतीच्या मुख्य गेटजवळ घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एस. सचिन कांबळे (वय २० रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ४४ वर्षीय तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रवासाच्या बहाण्याने रिक्षा चालकाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदे वस्ती परिसरात थांबलेले असताना, दुचाकीस्वार पाचजणांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात मोठमोठ्याने आरडाओरड करीत शांतता भंग केली. याप्रकरणी कांबळेला अटक करीत असून, उर्वरित आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजनुसार घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×