Breking News
गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

बहिणीला ‘व्हिडीओ काॅल’ करुन तरुणाने घेतला गळफास

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुण्यातील घटनेने खळबळ; पत्नीसह मुलींविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडीओ काॅल करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन – सविस्तर बातमी

नितीन अशोक साळवे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पूनम उमेश कांबळे (वय ४०, रा. कोकीळा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन साळवे यांची पत्नी आरती नितीन साळवे (वय ३८), तसेच त्यांच्या १८ आणि २० वर्षांच्या मुलींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक साळवे हे मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन मुलींबरोबर ते पर्वती परिसरातील लक्ष्मीनगर येथे रहात होते. कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यात वाद व्हायचे. २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बहीण पूनम कांबळे यांच्या मोबाइल क्रमांकावर ‘व्हिडीओ काॅल’ सुविधेचा वापर करुन संपर्क साधला.

पत्नी आणि मुलींसोबत नेहमी होणाऱ्या वादामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची बहीण पूनम कांबळे यांनी नुकतीच पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कांबळे यांनी पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×